ह्या स्वातंत्र्यदिनी, डोळ्यात आलं पाणी
ह्या स्वातंत्र्यदिनी आलेल्या अनेक शुभेच्छा संदेशांमधे एक अत्यंत वेगळा फोटो होता, जो बघितल्यावर डोळ्यात पाणी आलं. आणि त्यानंतर डोळ्यात पाणी आणणारी आणखी एक घटना घडली. सुट्टी असल्याने प्रभात फेरीसाठी सकाळी उशिरा बाहेर पडलो आणि भरपूर चालून परत येताना घराजवळ ठप्प झालेल्या वाहतुकीमधे अडकलो. काही तरुणांनी एक ट्रक आणि खूप मोटारसायकली आडव्या लावून रस्ता बंद केला …