fbpx

बकेट लिस्ट – आमचीही

द बकेट लिस्ट नामक एक इंग्रजी सिनेमा अनेक वर्षांपूर्वी आम्ही पहिला होता. तो इंग्रजीत असल्यामुळे आम्हाला समजला नाही.

बकेट लिस्ट नावाचा मराठी सिनेमा आम्ही नुकताच बघितला. तो मराठीत असूनही आम्हाला समजला नाही. सिनेमाच काय, आम्हाला तर त्याचं नाव देखील कळालं नाही.

‘Google Translate’ संकेतस्थळाला आम्ही ‘बकेट लिस्ट’ या शब्दांचा अर्थ विचारला असता त्याने ‘बादलीची यादी’ असे उत्तर दिले.

Bucket List Translation

करोडो रुपये पाण्यासाठीच पाण्यात घालवून वर्षानुवर्षे रखडलेले सिंचन प्रकल्प अजूनही पूर्ण न झालेल्या आमच्या ‘महा’ राष्ट्रामधे बादलीची गरज सगळ्यांनाच पडते. परंतु यादी करण्याइतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या बादल्यांची गरज आमच्या पुरातन – परंतु तरीही एकतर्फी – स्नेही, माधुरी दिक्षित, यांना का पडावी ह्या कुतुहलापाई आम्ही तो सिनेमा बघायला गेलो होतो…

 

………………………………………………………………..

हा लेख माझ्या पुस्तकात समाविष्ट झाला असल्याने येथे अपूर्ण आहे. 

 

2 thoughts on “बकेट लिस्ट – आमचीही”

Leave a Reply

You cannot copy content.

%d bloggers like this: