fbpx

आपला(च) माणूस

नुकताच ‘आपला मानूस’ हा सिनेमा बघितला. नानासाहेब पाटेकर यांचा सिनेमा असल्यामुळे आमच्या अपेक्षा जरा उंचावल्या होत्या.

सिनेमा सुरू होतो अल्फ्रेड हिचकॉक स्टाईल मधे प्रेक्षकांच्या समोर एक डेड बॉडी पडून!

ते पाहताच आम्ही घाबरून, मोबाईल बंद करून, धडधडत्या छातीला अन वाढत्या पोटाला न जुमानता, लाह्या खात खात सिनेमात रंगून गेलो. थोड्या वेळानी कळलं कि नानासाहेबांचा डब्बल रोल आहे, म्हणून आम्ही लाह्या खायचा आमचा वेगही डब्बल केला.

पण लगेचच सिनेमा भरकटायला लागला आणि रस्ता चुकलेल्या येष्टी डायवरच्या मागे गप्प बसून, प्रवास संपायची वाट बघण्याची वेळ आली. गाडी येळकंब खुर्द आणि येळकंब बुद्रुक पैकी नक्की कुठे जाणार असा विचार आम्ही करत असताना ती तिसऱ्याच ठिकाणी पोचली.

पैसा वसूल करायची आमची जन्मजात सवय असल्याने आम्ही टीव्हीवर फुकट असलेला सिनेमा नेटाने बघत बसलो, (जाहिराती सहन करतोच ना आम्ही? मग सिनेमा फुकट कसा?)  पण लवकरच मोबाईल चालू आणि डोळे बंद करायची वेळ आली – म्हणजे त्या सिनेमावाल्यांनी आणली.

सुरुवातीला जी मर्डर मिस्ट्री वाटली ती मर मर आणि डर डर करत शेवटी फ्यामिली ड्रामा झाली. त्यामुळे, तमाशा पाहायला पहिल्यांदाच गेलेल्या महाशयांना भक्तीगीते ऐकायला मिळाल्यावर त्यांची जशी हालत होईल, तशी आमची झाली. म्हणजे, डोक्यात झिणझीण्या आणणाऱ्या झणझणीत रम बरोबर, चमचमीत चकण्याऐवजी मिळमिळीत केळं खायची पाळी आली, अन त्यानंतर आमच्या पोटात रम रडली आणि केळं कळवळलं…

………………………………………………………………..

 

हा लेख माझ्या पुस्तकात समाविष्ट झाला असल्याने येथे अपूर्ण आहे. 

25 thoughts on “आपला(च) माणूस”

 1. तुमची लिहिण्याची पद्धत मला खूप आवडली…आजच ब्लॉगचे अकाऊंट काढले आणि तुमचाच पहिला लेख वाचला…म्हणजे मंदिरात गेल्या गेल्याच स्वादिष्ट प्रसाद मिळाल्यासारखे झालं हेतर😊

 2. Swatee Bapat

  काटकोन त्रिकोण नाटक फार छान वाटले होते. पण सिनेमा खूपच ढिसाळ आहे याबद्दल दुमत नाही.

 3. हेमंत बोरावके

  खुपच मस्त रे ,मन लावून पिक्चर पहातोस .

 4. Sanjay Jagtap

  Chiktyaa, your writing style reflects your personality (as we know from school days). Probably, rare for a pilot. I enjoyed your blogs. The humor is timely, precise, rib-tickling and a mood-changer. Keep writing.

 5. मराठी विनोदी लिखाणात कसदार लेखक शोधून सापडत नाहीत सध्या. ती उणीव तू भरून काढशील अशी माझी अपेक्षा आहे. अपेक्षा भंग करु नकोस.

 6. डॉ. विवेक बेळेंचं ‘काटकोन त्रिकोण’ जरूर पाहायला हवंस. आम्ही आधी ते पाहिलं होतं. नंतर ‘आपला अमानुष’ पाहायला गेलो. त्या सिनेमाबद्दल बऱ्याच अंशी तुझ्याशी सहमत आहे. नाटकात पात्रांची काटकसर सयुक्तिक वाटली होती. पण म्हणून सिनेमातही डबल रोल ठेवायची काहीच गरज नव्हती. असो.

Leave a Reply

You cannot copy content.

%d bloggers like this: