उन्नती

नाव ठेवणे आणि नावं ठेवणे ह्यात किती फरक आहे? म्हणलं तर खूप, अन पाहिलं तर काहीच नाही.

नावं ठेवणारे खूप पोटतिडकीने नावं ठेवतात, तरीही त्यात सत्य नसतं आणि बारशाला नाव ठेवणारे अत्यंत प्रेमाने अन आशेने बाळाचे नाव ठेवतात, पण त्यातही फार तथ्य नसतं. कारण, त्यानंतर कोणाच्या नावाचा आणि व्यक्तिमत्वाचा किती मेळ बसेल, हे सांगता येत नाही, आणि बहुतेकांचा तर बसतच नाही.

‘राम’ आणि ‘लक्ष्मण’ तुम्ही अनेक पहिले असतील, ‘रावण’ नावाचा कोणी बघितलाय कधी? बरं, ‘करण’ आणि ‘अर्जुन’ देखील खूप भेटतात, पण एखादा ‘दुर्योधन’ किंवा ‘दुस्शासन’ भेटलाय तुम्हाला? त्यानंतर ‘अशोक’ आणि ‘दिलीप’ हि नावं जेव्हा लोकप्रिय होती तेव्हा ‘प्राण’ नावाचा कोणी सापडला का कधी? आजकाल मात्र नायक आणि खलनायक ह्यांच्यातला फरक – सिनेमात आणि वास्तवातही – फारसा न राहिल्याने, नावांना काहीच अर्थ उरलेला नाही.

‘संग्राम’ नावाचा एक अत्यंत मिळमिळीत माणूस माझ्या ओळखीचा आहे आणि दुसरा एक किडकिडीत ‘बलराम’ मला माहिती आहे. एक ‘सत्यवान’ नावाचा माझा वर्गमित्र लहानपणापासूनच त्याच्या नावाला इतका जागला, कि मॅट्रिकला नापास झाल्यानंतर लगेचच त्यानी स्वतःला समाजसेवेत (हे त्याचे शब्द) म्हणजे राजकारणात झोकून घेतलं. चार वेळा पार्ट्या बदलल्या नसत्या तर आत्तापर्यंत मंत्री झाला असता बघा.

इतरांचं सोडा, माझं स्वतःचं नाव ‘अविनाश’ असलं तरी आयुष्यातल्या अनेक लहान मोठ्या लढायांमध्ये माझा विनाश झालेला आहे, आणि लग्नानंतर तर जरा जास्तच नियमितपणे होत आहे…

………………………………………………………………..

हा लेख माझ्या पुस्तकात समाविष्ट झाला असल्याने येथे अपूर्ण आहे. 

संपूर्ण लेख वाचण्यासाठी आणि इतर अशाच लेखांचा आनंद घेण्यासाठी कृपया खालील पैकी एका लिंकवर ते पुस्तक घ्या. धन्यवाद.

बुकगंगा: https://tinyurl.com/CHASHME-BUDDU-Bookganga

गुगल: https://tinyurl.com/CHASHME-BUDDU-Google-Play-Book

किंडल: https://tinyurl.com/CHASHME-BUDDU-Amazon-Kindle

 

Cover2 Chashme Buddu

 

 

24 Comments

 1. I fully subscribe to your views about status of Girl child and women in general in our society.
  Its high time we all treat them equal in all aspects of life and give them equal opportunities in their development wherever possible.I have my reservations about them only for d fighting arms in services.

  Like

 2. जेव्हा सर्व पुरुष जात असा विचार करतील तेव्हाच “मुलगी शिकली – उन्नती झाली” असे म्हणता येईल.

  Like

 3. Sir, very well written . I know her and her family . Her father is from my native village Rui near Ichalkaranji .
  All the best to Unnati and her instructor . Regards .

  Like

 4. Sir very interesting article. तुमचे लेख वाचून दर वेळेस आयुष्यात काही ना काही इन्स्पिरेशन मिळते आणि खूप छान वाटते. खुप खुप धन्यवाद सर.

  Like

 5. उन्नती आवडली. संपूर्ण समाजाची प्रगती व्हावी असेच वाटते.
  मला एकूणच डेज् प्रकरण आवडत नाही. त्यातून महिला दिन तर मुळीच नाही. एकीकडे आम्ही पुरूषांच्या बरोबरीने सगळे करतो, त्यांच्या पेक्षा कमी नाही असे म्हणायचे. तर दुसरीकडे हा दिवस साजरा करून उगीचच कौतुक करून घ्यायचे. महिला खरोखरीच स्वतःला सक्षम समजत असतील तर प्रथम महिलादिन प्रकरण बंद केले पाहिजे.

  Like

 6. 👏👏👏
  छान.
  चुरचुरीत लेखातून ‘उन्नतीची’ भरारी वाचताना मजा आली.
  स्वातीलाही दाखवतो.
  कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

  Like

Leave a Reply to Avinash Chikte Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s