पुन्हा एकदा लॉकडाऊन सुरु झाल्याने, एक मोठा सुस्कारा सोडून मी पुन्हा एकदा घरात कामाला लागलो. अचानक रेडिओवर एक गाणे सुरु झाले आणि मला प्रेरणा मिळाली.
हे अजरामर कोळीगीत लिहिणाऱ्या शांताताई शेळके यांचे आभार मानून, तुमच्या-आमच्या घरी वर्षानुवर्षे घरकाम करणाऱ्या स्त्रियांना – ज्यांना पूर्वी मोलकरीण म्हणायचे पण आता ताई किंवा मावशी म्हणतात – हे विडंबन अर्पण.
मराठीत ‘मोलकरीण’ ह्या स्त्रीलिंगी शब्दाला सम अर्थाचा पुल्लिंगी शब्द नाही, म्हणून मी मराठी भाषेला एक नवीन शब्द – ‘मोलकर’ – बहाल करून एक ‘बळी’ गीत लिहिले.
‘मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा’ गाण्याच्या चालीवर म्हणून बघा. 🙂
(बायकोचा कोरस)
घासून दाखवा हो भांडी ही आता, घासून दाखवा हो भांडी ही आता
(गंभीर आवाजात मी)
मी मोलकर मोलकर, मोलकर किचनचा राजा
धुणी भांड्यासाठी बाथरूमला करतो येजा ssss
मी मोलकर मोलकर, मोलकर किचनचा राजा
(बायकोचा कोरस)
घासून दाखवा हो भांडी ही आता, घासून दाखवा हो भांडी ही आता
(रडक्या आवाजात मी)
माय बापाचा लाडाचा लेक मी अवी
धुणी भांडीवाली मलाहो लगेच हवी
माझ्या हाताला हो घालीला रबराचा मोजा
भांडी घासताना हाताला होई ना इजा
बायको कामांचा वाजवी बाजा
मला कसली ही मिळाली सजा
माझ्या घराचा मी हो राजा ssss
दिन रातीला, बसून चिरतोय भाज्या!
दिन रातीला, बसून चिरतोय भाज्या ssss
मी मोलकर मोलकर, मोलकर किचन चा राजा
(बायकोचा कोरस)
घासून दाखवा हो भांडी ही आता, घासून दाखवा हो भांडी ही आता
© अविनाश चिकटे
कार्टून सौजन्य: ClipartKey
हे विडंबन माझ्या ‘भार्या, भांडी, भांडण आणि मी’ ह्या लेखात आहे. तो लेख ‘चष्मे बुद्दू’ पुस्तकात आहे.
😄very well written sir!👏👏👏
LikeLike
🙏😀
LikeLike
एक नंबर कॅप्टन 👍
LikeLike
🙏😀
LikeLike
अत्यंत सुंदर विडंबन
LikeLike
धन्यवाद! 🙏
LikeLike
लई भारी , मी इमॅजिन करते की तू मोजे 🧤घालून भांडी घडतोय , पण खून छान लिहिले आहेस🌹🌹 प्रेरणा विद्या ची ना??🤪
LikeLike
नक्कीच!😀
LikeLike
Very realistic remix of the song Sir !!
I could actually imagine Ma’am in the chorus 😄😄
LikeLike
Thank you. 😀🙏
LikeLike
भारी..
LikeLike
🙏
LikeLike
Avi,
another gem from you
LikeLike
🙏
LikeLike
अप्रतिम. आपल्या सर्वांच्या पिडेच छान वर्णन. 👍👌🏽
LikeLike
धन्यवाद. 🙏
LikeLike
अप्रतिम…. खरं आहे मोलकर किचन चा राजा
LikeLike
😀🙏
LikeLike
Haha
LikeLike
🙏😀
LikeLike
Bhari ,Jamtay,jamtay
LikeLike
धन्यवाद.
LikeLike
ZakaaaaaaaS
LikeLike
धन्यवाद!
LikeLike
😂अवि शाबास!
सर्व मोलकऱ्यांचे दुःख जगासमोर आणल्याबद्दल!
पुढच्या कडव्याच्या दोन ओळी सुचवतोय. ते कडवंही पूर्ण करून टाक.
“धुणं वालत घालताना दांडी येते खाली,
कसं अवचित गो टेंगूल पडते कपाली…
आपला समदुःखी मोलकर,
आनंद बापट 🙏
😂😂😂
LikeLike
पुढच्या वेळी आपण सलीम जावेद प्रमाणे एकत्र लिहू!
LikeLike
नक्की! 😁
LikeLike