मागच्या महिन्यात माझ्या पुस्तकाचे मुखपृष्ठ मी इथे आणि सोशल मिडीयावर लोकांना पाठवले होते. माझे तरुण मित्र ज्ञानेश्वर राहिंज यांनी ते त्यांच्या पारनेरच्या मित्रांना पाठवले. माझ्या नशिबाने ते श्री. अण्णा हजारेंच्या नजरेस पडले आणि त्यांना ते आवडले.
आण्णांचे सेक्रेटरी श्री संजय पठाडे आणि पत्रकार श्री चांद शेख यांच्या सौजन्याने काल अण्णांची भेट झाली, कोव्हीड मुळे ते लोकांना भेटत नसूनही.
अण्णांनी आम्हाला आशीर्वाद दिले आणि खूप गप्पा मारल्या. त्यांच्या कामाच्या गराड्यातून आम्हाला अर्धा तास मिळाला होता, पण एक तास कधी गेला कळलंच नाही.
त्यानंतर त्यांनी एका प्रतीवर सही करून पुस्तकाचे प्रकाशन केले.
दिवस अगदी छान गेला आणि सारे काही मला हवे होते तसे झाले, तरीही राळेगणसिद्धी सोडून घरी परतल्यावर मनात चलबिचल चालू झाली आणि कसली तरी हुरहूर लागून राहिली. खूप विचार केला, पण कारण काही कळेना.
शेवटी आज उत्तर मिळालं, एका कवितेच्या स्वरूपात.
स्वार्थासाठी भेटीस गेलो,
निस्वार्थी ते बघून हरखलो,
मला बघुनी मीच लाजलो,
सूर्याला मी स्पर्शून आलो.
ते धुरंधर, ते ज्ञानेश्वर,
ते निर्मोही, ते निरंतर,
सहवासाने हर्षून आलो,
सूर्याला मी स्पर्शून आलो.
वैरागी ते भीष्म तपस्वी
दिव्य ते त्यागी तेजस्वी,
उल्के सारखा क्षणिक चमकलो,
सूर्याला मी स्पर्शून आलो.
आयुष्य त्यांचे समर्थ सार्थक,
क्षणभंगुर मी, अति निरर्थक
साक्षात्कार हा घेवून आलो,
सूर्याला मी स्पर्शून आलो.
©अविनाश चिकटे
https://www.facebook.com/AvinashChikte/
अविनाश खूप सुंदर , आण्णाचीं भेट ,खरच बरं वाटतं तिथे गेल्यावर . माझी दोन वेळा भेट झाली होती राळेगण मध्ये. आपणास खूप खूप शुभेच्छा.
LikeLike
अविनाश खूप सुंदर , आण्णाचीं भेट ,खरच बरं वाटतं तिथे गेल्यावर . माझी दोन वेळा भेट झाली होती राळेगण मध्ये. आपणास खूप खूप शुभेच्छा.
LikeLike
धन्यवाद. 🙏🙂
LikeLike
Hats off sir!
LikeLike
Thank you, Sagar.
LikeLike
Great Bhet
LikeLike
It was unique, educative and humbling!
LikeLike