भुज – न भूतो न भविष्यति!
मी भारतीय हवाई सेनेत लढाऊ वैमानिक होतो आणि भुजमध्ये दोन कार्यकाळ केले आहेत. तब्बल पाच वर्षं त्या भागात उड्डाण केल्यामुळे, मी माझ्या वायूसेना आणि कच्छमधील आनंदी आठवणींना उजाळा देण्यास उत्सुक होतो. पण हा चित्रपट बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. खरंच आलं. पण हसून हसून पाणी आलं, कारण निर्माते इतके गंभीर असूनही हा चित्रपट हास्यास्पद निघाला. …