बायको गावाला गेली म्हणून…

माझी बायको शाळेच्या सहलीला एका दिवसासाठी गावाला गेली म्हणून सुचलेली हि कविता. मुलगा आणि नवीन सून,सजवलेल्या गाडीत बसून,भुर्रर्रकन गेले उडून,करायला हनिमून. त्यांना एवढं खुशीत बघून,बायकोला मिठीत घेऊन,मी म्हणालो आपणहून,आपला आता पुन्हा हनिमून. ती म्हणाली खुदकन हसून,मी गेलीये थकून भागून.मी म्हणलं तू ये उटीला जाऊन,अन् मी जातो डेहराडून!