एक (फेक) वात्रटिका

एक (फेक) वात्रटिका१४ ते २७ फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे पासून मराठी दिनापर्यंत… व्हॅलेंटाईन डेला, त्याच्या डार्लिंगला, गुलाबाचा बुके, त्याने गिफ्ट केला. शायनिंग करायला, लाँग राईड मारायला, सिटीच्या बाहेर, तो तिला घेऊन गेला. सुंदर सनसेटला, ठेवून साक्षीला,बुशेसच्या मागे तो, तिच्यासंगे लपला. सिनेमात पाहिलेले, गाणे त्याने सिंग केले,आणि ट्यून मधे तिला, ‘लव्ह यू’ सांगितले. बायसेप्स दाखवत, ‘आय मिस यू’ … More एक (फेक) वात्रटिका

सूर्याला मी स्पर्शून आलो

मागच्या महिन्यात माझ्या पुस्तकाचे मुखपृष्ठ मी इथे आणि सोशल मिडीयावर लोकांना पाठवले होते. माझे तरुण मित्र ज्ञानेश्वर राहिंज यांनी ते त्यांच्या पारनेरच्या मित्रांना पाठवले. माझ्या नशिबाने ते श्री. अण्णा हजारेंच्या नजरेस पडले आणि त्यांना ते आवडले. आण्णांचे सेक्रेटरी श्री संजय पठाडे आणि पत्रकार श्री चांद शेख यांच्या सौजन्याने काल अण्णांची भेट झाली, कोव्हीड मुळे ते … More सूर्याला मी स्पर्शून आलो

चष्मे बुद्दू

रोज आपल्याला कोणी ना कोणी – राजकारणी मंडळी, अनोळखी लोक, मित्र, नातेवाईक आणि कुटुंबीय देखील – ‘उल्लू’ बनवत असतात, जाणून बुजून किंवा अजाणतेपणी. त्याचा त्रास करून घ्यायचा, का त्यावर हसत मार्ग काढायचा, हे आपलं आपण ठरवायचं. खालील लिंकवर आत्ताच ऑर्डर करा.मोफत घरपोच सेवा.https://cashfree.com/ChashmeBuddu येथे पैसे भरण्याचे अनेक पर्याय आहेत, क्रेडीट आणि डेबिट कार्डस, नेट बँकिंग, … More चष्मे बुद्दू

मी मोलकर!

पुन्हा एकदा लॉकडाऊन सुरु झाल्याने, एक मोठा सुस्कारा सोडून मी पुन्हा एकदा घरात कामाला लागलो. अचानक रेडिओवर एक गाणे सुरु झाले आणि मला प्रेरणा मिळाली. हे अजरामर कोळीगीत लिहिणाऱ्या शांताताई शेळके यांचे आभार मानून, तुमच्या-आमच्या घरी वर्षानुवर्षे घरकाम करणाऱ्या स्त्रियांना – ज्यांना पूर्वी मोलकरीण म्हणायचे पण आता ताई किंवा मावशी म्हणतात – हे विडंबन अर्पण.  … More मी मोलकर!

उन्नती

नाव ठेवणे आणि नावं ठेवणे ह्यात किती फरक आहे? म्हणलं तर खूप, अन पाहिलं तर काहीच नाही. नावं ठेवणारे खूप पोटतिडकीने नावं ठेवतात, तरीही त्यात सत्य नसतं आणि बारशाला नाव ठेवणारे अत्यंत प्रेमाने अन आशेने बाळाचे नाव ठेवतात, पण त्यातही फार तथ्य नसतं. कारण, त्यानंतर कोणाच्या नावाचा आणि व्यक्तिमत्वाचा किती मेळ बसेल, हे सांगता येत … More उन्नती

आपला(च) माणूस

नुकताच ‘आपला मानूस’ हा सिनेमा बघितला. नानासाहेब पाटेकर यांचा सिनेमा असल्यामुळे आमच्या अपेक्षा जरा उंचावल्या होत्या. सिनेमा सुरू होतो अल्फ्रेड हिचकॉक स्टाईल मधे प्रेक्षकांच्या समोर एक डेड बॉडी पडून! ते पाहताच आम्ही घाबरून, मोबाईल बंद करून, धडधडत्या छातीला अन वाढत्या पोटाला न जुमानता, लाह्या खात खात सिनेमात रंगून गेलो. थोड्या वेळानी कळलं कि नानासाहेबांचा डब्बल … More आपला(च) माणूस

बकेट लिस्ट – आमचीही

द बकेट लिस्ट नामक एक इंग्रजी सिनेमा अनेक वर्षांपूर्वी आम्ही पहिला होता. तो इंग्रजीत असल्यामुळे आम्हाला समजला नाही. बकेट लिस्ट नावाचा मराठी सिनेमा आम्ही नुकताच बघितला. तो मराठीत असूनही आम्हाला समजला नाही. सिनेमाच काय, आम्हाला तर त्याचं नाव देखील कळालं नाही. ‘Google Translate’ संकेतस्थळाला आम्ही ‘बकेट लिस्ट’ या शब्दांचा अर्थ विचारला असता त्याने ‘बादलीची यादी’ … More बकेट लिस्ट – आमचीही

वाट वेगळी…

२०१२ साली माझा १९ वर्षांचा मुलगा, अग्नेय, बी कॉम करत होता आणि त्याबरोबरच त्याचा CA म्हणजे Chartered Accountant किंवा सनदी लेखापाल बनण्यासाठी अभ्यास चालू होता. CA होण्यासाठी पहिली पायरी असते, Common Proficiency Test (CPT) आणि दुसरी असते IPCC. CPT बरीच अवघड असते आणि फार तर चाळीस टक्के विद्यार्थी त्यात पास होतात. IPCC त्याहीपेक्षा कठीण असते … More वाट वेगळी…

भाग्यासी काय उणे रे…

आपण बरेचदा म्हणत असतो की माझ्याकडे पैसे नाहीत, किंवा पुरेसं शिक्षण नाही, किंवा मी खेड्यात जन्मलो, किंवा नशिबानं साथ दिली नाही म्हणून मला हवं तेवढं मोठं होता आलं नाही. बरोबर? तर ऐका राईट बंधूंची कहाणी. आपणा सगळ्यांना माहित आहे कि जगात विमान उडवणारे ते पहिले. पण त्यामागचे कष्ट आणि जिद्द किती जणांना ठावूक आहेत? ओर्विल … More भाग्यासी काय उणे रे…

ह्या स्वातंत्र्यदिनी, डोळ्यात आलं पाणी

ह्या स्वातंत्र्यदिनी आलेल्या अनेक शुभेच्छा संदेशांमधे एक अत्यंत वेगळा फोटो होता, जो बघितल्यावर डोळ्यात पाणी आलं. आणि त्यानंतर डोळ्यात पाणी आणणारी आणखी एक घटना घडली. सुट्टी असल्याने प्रभात फेरीसाठी सकाळी उशिरा बाहेर पडलो आणि भरपूर चालून परत येताना घराजवळ ठप्प झालेल्या वाहतुकीमधे अडकलो. काही तरुणांनी एक ट्रक आणि खूप मोटारसायकली आडव्या लावून रस्ता बंद केला … More ह्या स्वातंत्र्यदिनी, डोळ्यात आलं पाणी