Chashme Buddu

रोज आपल्याला कोणी न कोणी – राजकारणी मंडळी, अनोळखी लोक, मित्र, नातेवाईक आणि कुटुंबीय देखील – ‘उल्लू’ बनवत असतात, जाणून बुजून किंवा अजाणतेपणी. त्याचा त्रास करून घ्यायचा का त्यावर हसत मार्ग काढायचा, हे आपलं आपण ठरवायला हवं.

गल्लीतल्या नेताजींचे कर्कश्य देशप्रेम, सिनेमातल्या न पटणाऱ्या पटकथा, मुलांच्या भविष्याची चिंता, देशाला भेडसावणारी गंभीर समस्या, किंवा नेहेमीच्या ‘कूपमंडूक’ मनस्थितीतून बाहेर डोकवायला भाग पडणारे अनेक प्रसंग.

प्रसंग रोजचेच, त्यात भेटलेले काही नमुने तर काही थोर व्यक्ती. अनुभव सर्वसामान्यच, आजारी पडणे किंवा बायकोसाठी चष्मा घेणे. समस्या नेहेमीच्याच, मुलाच्या करिअरचा प्रश्न असो किंवा साधे रस्त्यावरून घरी जाणे असो. प्रयत्न साधे आणि सर्वांसारखेच, त्यात कधी यश मिळते तर कधी अपयश. कधी चार चौघात नाचक्की होते, तर कधी खाजगी मध्ये – फक्त बायको समोर!

सुख-दु:खे नेहेमीचीच, पण त्यांच्याकडे मिश्कील चष्म्यातून बघितल्यावर आपण किती बुद्दू ठरलो हे दिसल्यावर देखिल हसता येणे हाही पराक्रमच.

विनोदाला कारुण्याची झालर असावी असे विचारवंत म्हणतात. इथे जगण्याच्या धडपडीत आयुष्यच इतकं कारुण्यमय झालं आहे कि अधून मधून त्यात हसण्यासारखे प्रसंग वेचावे अन साठवावे लागतात. असेच हे प्रसंग.

विद्वत्तेचा खोटा आव न आणता, काहीही भव्य दिव्य न केलेल्या आणि करूही न शकणाऱ्या सामान्य माणसाचे हे हास्य-चिंतन, तुम्हाला हसवेल, सुखावेल, आणि अधून मधून हेलावूनही सोडेल.

 

 

कृपया खालील पैकी कुठल्याही एका लिंकवर हे पुस्तक घ्या.

धन्यवाद.

बुकगंगा: https://tinyurl.com/CHASHME-BUDDU-Bookganga

गुगल: https://tinyurl.com/CHASHME-BUDDU-Google-Play-Book

किंडल: https://tinyurl.com/CHASHME-BUDDU-Amazon-Kindle