Chashme Buddu (Marathi) चष्मे बुद्दू मराठी विनोदी कथा
₹150₹119
रोज आपल्याला कोणी ना कोणी – राजकारणी मंडळी, अनोळखी लोक, मित्र, नातेवाईक आणि कुटुंबीय देखील – ‘उल्लू’ बनवत असतात, जाणून बुजून किंवा अजाणतेपणी. त्याचा त्रास करून घ्यायचा, का त्यावर हसत मार्ग काढायचा, हे आपलं आपण ठरवायचं.
आयुष्य आपल्याला कधी गुगली टाकतं, तर कधी बाउन्सर. त्यामुळे विकेट पेक्षा डोकं वाचवण्याची चिंता जास्त. मग आपण सिक्सर मारणार तरी कधी आणि किती? पण म्हणून काय मैदान सोडून निघून जायचं? नाही! वरच्या अम्पायरचा हुकुम येईपर्यंत लढत राहायचं, हसत रहायचं!
विनोदाला कारुण्याची झालर असावी असे विचारवंत म्हणतात. इथे जगण्याच्या धडपडीत आयुष्यच इतकं कारुण्यमय झालं आहे कि कधीकधीच त्यात हसण्यासारखे काही प्रसंग येतात, जे वेचावे अन साठवावे लागतात. हेच ते प्रसंग.
प्रसंग रोजचेच, त्यात भेटलेले काही ‘नमुने’ तर काही थोर व्यक्ती. समस्या नेहेमीच्याच, प्रयत्न साधे आणि सर्वांसारखेच, त्यात कधी यश मिळतं तर कधी अपयश. कधी चार चौघात नाचक्की होते, तर कधी फक्त बायको समोर!
थोडक्यात काय, सुख दु:खे नेहेमीचीच, पण त्यांच्याकडे मिश्कील चष्म्यातून बघून, आपण किती बुद्दू ठरलो हे कळल्यावरही हसता येणे हा ही पराक्रमच.
विद्वत्तेचा आव न आणता, काहीही भव्य दिव्य न केलेल्या आणि करूही न शकणाऱ्या सामान्य माणसाचे हे हास्य-चिंतन, तुम्हाला हसवेल, सुखावेल, आणि अधून मधून हेलावूनही सोडेल.
If you don’t read Marathi, gift it to someone who does. Gift a Laugh!
कोव्हीड मुळे हे दिवस आपणा सर्वांनाच कठीण जात आहेत. अजूनही मनात आशा आहे, उत्साह आहे, पण चिंता देखील आहे. हीच वेळ आहे मन हलकं करण्याची, थोडसं हसण्याची आणि हसवण्याची.
हे विडंबन माझ्या ‘भार्या, भांडी, भांडण आणि मी’ ह्या लेखात आहे. तो लेख ‘चष्मे बुद्दू’ पुस्तकात आहे.
पुन्हा एकदा लॉकडाऊन सुरु झाल्याने, एक मोठा सुस्कारा सोडून मी पुन्हा एकदा घरात कामाला लागलो. अचानक रेडिओवर एक गाणे सुरु झाले आणि मला प्रेरणा मिळाली.
हे अजरामर कोळीगीत लिहिणाऱ्या शांताताई शेळके यांचे आभार मानून, तुमच्या-आमच्या घरी वर्षानुवर्षे घरकाम करणाऱ्या स्त्रियांना – ज्यांना पूर्वी मोलकरीण म्हणायचे पण आता ताई किंवा मावशी म्हणतात – हे विडंबन अर्पण.
मराठीत ‘मोलकरीण’ ह्या स्त्रीलिंगी शब्दाला सम अर्थाचा पुल्लिंगी शब्द नाही, म्हणून मी मराठी भाषेला एक नवीन शब्द – ‘मोलकर’ – बहाल करून एक ‘बळी’ गीत लिहिले.
Reviews
There are no reviews yet.