fbpx

मराठी

सिंधुताई सपकाळ – एक सुपरमॉम

१४ नोव्हेंबर २०२१ रोजी, सिंधुताई सपकाळ उर्फ माई यांच्या वाढदिवसा निमित्त हा लेख महाराष्ट्र टाईम्स मधे प्रकाशित झाला होता. मागच्याच आठवड्यात एका महान दानशूर व्यक्तीला विमानात भेटण्याचे सौभाग्य मला लाभले आणि त्या भेटीबद्दलचा माझा लेख, ‘मीटिंग अझीम प्रेमजी: ए क्लास अपार्ट इन कॅटल-क्लास’ बराच लोकप्रिय झाला. दुसरं एखादं थोर व्यक्तिमत्व पुन्हा कधी आणि कसं भेटणार …

सिंधुताई सपकाळ – एक सुपरमॉम Read More »

भुज – न भूतो न भविष्यति!

मी भारतीय हवाई सेनेत लढाऊ वैमानिक होतो आणि भुजमध्ये दोन कार्यकाळ केले आहेत. तब्बल पाच वर्षं त्या भागात उड्डाण केल्यामुळे, मी माझ्या वायूसेना आणि कच्छमधील आनंदी आठवणींना उजाळा देण्यास उत्सुक होतो. पण हा चित्रपट बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. खरंच आलं. पण हसून हसून पाणी आलं, कारण निर्माते इतके गंभीर असूनही हा चित्रपट हास्यास्पद निघाला. …

भुज – न भूतो न भविष्यति! Read More »

उन्नती

नाव ठेवणे आणि नावं ठेवणे ह्यात किती फरक आहे? म्हणलं तर खूप, अन पाहिलं तर काहीच नाही. नावं ठेवणारे खूप पोटतिडकीने नावं ठेवतात, तरीही त्यात सत्य नसतं आणि बारशाला नाव ठेवणारे अत्यंत प्रेमाने अन आशेने बाळाचे नाव ठेवतात, पण त्यातही फार तथ्य नसतं. कारण, त्यानंतर कोणाच्या नावाचा आणि व्यक्तिमत्वाचा किती मेळ बसेल, हे सांगता येत …

उन्नती Read More »

आपला(च) माणूस

नुकताच ‘आपला मानूस’ हा सिनेमा बघितला. नानासाहेब पाटेकर यांचा सिनेमा असल्यामुळे आमच्या अपेक्षा जरा उंचावल्या होत्या. सिनेमा सुरू होतो अल्फ्रेड हिचकॉक स्टाईल मधे प्रेक्षकांच्या समोर एक डेड बॉडी पडून! ते पाहताच आम्ही घाबरून, मोबाईल बंद करून, धडधडत्या छातीला अन वाढत्या पोटाला न जुमानता, लाह्या खात खात सिनेमात रंगून गेलो. थोड्या वेळानी कळलं कि नानासाहेबांचा डब्बल …

आपला(च) माणूस Read More »

बकेट लिस्ट – आमचीही

द बकेट लिस्ट नामक एक इंग्रजी सिनेमा अनेक वर्षांपूर्वी आम्ही पहिला होता. तो इंग्रजीत असल्यामुळे आम्हाला समजला नाही. बकेट लिस्ट नावाचा मराठी सिनेमा आम्ही नुकताच बघितला. तो मराठीत असूनही आम्हाला समजला नाही. सिनेमाच काय, आम्हाला तर त्याचं नाव देखील कळालं नाही. ‘Google Translate’ संकेतस्थळाला आम्ही ‘बकेट लिस्ट’ या शब्दांचा अर्थ विचारला असता त्याने ‘बादलीची यादी’ …

बकेट लिस्ट – आमचीही Read More »

वाट वेगळी…

२०१२ साली माझा १९ वर्षांचा मुलगा, अग्नेय, बी कॉम करत होता आणि त्याबरोबरच त्याचा CA म्हणजे Chartered Accountant किंवा सनदी लेखापाल बनण्यासाठी अभ्यास चालू होता. CA होण्यासाठी पहिली पायरी असते, Common Proficiency Test (CPT) आणि दुसरी असते IPCC. CPT बरीच अवघड असते आणि फार तर चाळीस टक्के विद्यार्थी त्यात पास होतात. IPCC त्याहीपेक्षा कठीण असते …

वाट वेगळी… Read More »

भाग्यासी काय उणे रे…

आपण बरेचदा म्हणत असतो की माझ्याकडे पैसे नाहीत, किंवा पुरेसं शिक्षण नाही, किंवा मी खेड्यात जन्मलो, किंवा नशिबानं साथ दिली नाही म्हणून मला हवं तेवढं मोठं होता आलं नाही. बरोबर? तर ऐका राईट बंधूंची कहाणी. आपणा सगळ्यांना माहित आहे कि जगात विमान उडवणारे ते पहिले. पण त्यामागचे कष्ट आणि जिद्द किती जणांना ठावूक आहेत? ओर्विल …

भाग्यासी काय उणे रे… Read More »

ह्या स्वातंत्र्यदिनी, डोळ्यात आलं पाणी

ह्या स्वातंत्र्यदिनी आलेल्या अनेक शुभेच्छा संदेशांमधे एक अत्यंत वेगळा फोटो होता, जो बघितल्यावर डोळ्यात पाणी आलं. आणि त्यानंतर डोळ्यात पाणी आणणारी आणखी एक घटना घडली. सुट्टी असल्याने प्रभात फेरीसाठी सकाळी उशिरा बाहेर पडलो आणि भरपूर चालून परत येताना घराजवळ ठप्प झालेल्या वाहतुकीमधे अडकलो. काही तरुणांनी एक ट्रक आणि खूप मोटारसायकली आडव्या लावून रस्ता बंद केला …

ह्या स्वातंत्र्यदिनी, डोळ्यात आलं पाणी Read More »

%d bloggers like this: