भारी आहे, ‘बाईपण भारी देवा’
काल अचानक सुट्टी मिळाली आणि बायको माझा कान धरून – नाही, अगदी कान नाही – हात धरून, हा सिनेमा बघायला घेऊन गेली. आधी आम्हाला सिनेमाचं नावच कळेना. बाईपण भारी? का बाई पण भारी? पोस्टर बघितल्यावर लक्षात आलं, की ‘लहानपण देगा देवा’ च्या चालीवर ‘बाईपण भारी देवा’ हे नाव असावं. पण असा फक्त आमचा अंदाज आहे, कारण अजूनही आमच्या …