मराठी

माय मराठी माझी, परंतु…

काल मराठी भाषा दिवस होता. त्या निमित्ताने बऱ्याच लोकांनी आपल्या भाषेचं कौतुक केलं, काहींनी अश्रू गाळले आणि अनेकांनी दरवर्षी पाठवलेले शुद्ध मराठी शुभेच्छा संदेश (जे त्यांना वर्षातून एकदाच इतके शुद्ध लिहिता येतात) पाठवले, उद्यापासून पुन्हा गाडी गुड मॉर्निंग च्या रुळावर येईल हे माहित असूनही. काल मी माझ्या कंपनीच्या कार्यालयामध्ये गेलो होतो. तिथे एक मुलगी जी […]

माय मराठी माझी, परंतु… Read More »

आपलं छोटसं जीवन सार्थ करणाऱ्या सार्थकची कहाणी

तुम्हाला कधीही बरा होऊ न शकणारा आजार आहे असं जर कोणी सांगितलं तर तुम्ही काय म्हणाल? तुम्हाला लवकरच मृत्यू येणार आहे हे कळल्यावर काय कराल तुम्ही? बेफिकीर होऊन उरलेलं आयुष्य हसत जगायची हिम्मत आहे तुमच्यात? सार्थक मधे ती धमक होती, आणि तो आयुष्यभर हसत राहिला.   ही त्याची सत्यकथा आहे. त्याच्या छोट्याशा आयुष्यात तो हसत

आपलं छोटसं जीवन सार्थ करणाऱ्या सार्थकची कहाणी Read More »

असामान्य सामान्यता

ही घटना नोव्हेंबर २०२१ मध्ये घडली, पण ह्यातील नायकाचा आज वाढदिवस आहे म्हणून आज हा लेख मराठीत अनुवादित करतोय. त्या दिवशी, नेहमीप्रमाणे माझ्या एअरलाइनच्या कॉकपिट मध्ये बसायच्या ऐवजी, मला दुसऱ्या एअरलाइनच्या विमानात प्रवासी म्हणून जाण्याची संधी मिळाली. विमानातच बसायचं तर मला कॉकपिटमध्ये बसायला मला जास्त आवडतं, कारण ते चाळीस हजार फुटावरचं माझं ऑफिस आहे. हे

असामान्य सामान्यता Read More »

भारी आहे, ‘बाईपण भारी देवा’

काल अचानक सुट्टी मिळाली आणि बायको माझा कान धरून – नाही, अगदी कान नाही – हात धरून, हा सिनेमा बघायला घेऊन गेली. आधी आम्हाला सिनेमाचं नावच कळेना. बाईपण भारी? का बाई पण भारी? पोस्टर बघितल्यावर लक्षात आलं, की ‘लहानपण देगा देवा’ च्या चालीवर ‘बाईपण भारी देवा’ हे नाव असावं. पण असा फक्त आमचा अंदाज आहे, कारण अजूनही आमच्या

भारी आहे, ‘बाईपण भारी देवा’ Read More »

diy yellow easter eggs

बायको गावाला गेली म्हणून…

माझी बायको शाळेच्या सहलीला एका दिवसासाठी गावाला गेली म्हणून सुचलेली हि कविता. मुलगा आणि नवीन सून,सजवलेल्या गाडीत बसून,भुर्रर्रकन गेले उडून,करायला हनिमून. त्यांना एवढं खुशीत बघून,बायकोला मिठीत घेऊन,मी म्हणालो आपणहून,आपला आता पुन्हा हनिमून. ती म्हणाली खुदकन हसून,मी गेलीये थकून भागून.मी म्हणलं तू ये उटीला जाऊन,अन् मी जातो डेहराडून!

बायको गावाला गेली म्हणून… Read More »

सिंधुताई सपकाळ – एक सुपरमॉम

मागच्याच आठवड्यात एका महान दानशूर व्यक्तीला विमानात भेटण्याचे सौभाग्य मला लाभले आणि त्या भेटीबद्दलचा माझा लेख, ‘मीटिंग अझीम प्रेमजी: ए क्लास अपार्ट इन कॅटल-क्लास’ बराच लोकप्रिय झाला. दुसरं एखादं थोर व्यक्तिमत्व पुन्हा कधी आणि कसं भेटणार असा मी विचार करत असतानाच आणखी एक व्यक्ती माझ्या विमानात – आणि आयुष्यात – आली, ह्याच आठवड्यात मी दिल्ली-पुणे

सिंधुताई सपकाळ – एक सुपरमॉम Read More »

भुज – न भूतो न भविष्यति!

मी भारतीय हवाई सेनेत लढाऊ वैमानिक होतो आणि भुजमध्ये दोन कार्यकाळ केले आहेत. तब्बल पाच वर्षं त्या भागात उड्डाण केल्यामुळे, मी माझ्या वायूसेना आणि कच्छमधील आनंदी आठवणींना उजाळा देण्यास उत्सुक होतो. पण हा चित्रपट बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. खरंच आलं. पण हसून हसून पाणी आलं, कारण निर्माते इतके गंभीर असूनही हा चित्रपट हास्यास्पद निघाला.

भुज – न भूतो न भविष्यति! Read More »

उन्नती

नाव ठेवणे आणि नावं ठेवणे ह्यात किती फरक आहे? म्हणलं तर खूप, अन पाहिलं तर काहीच नाही. नावं ठेवणारे खूप पोटतिडकीने नावं ठेवतात, तरीही त्यात सत्य नसतं आणि बारशाला नाव ठेवणारे अत्यंत प्रेमाने अन आशेने बाळाचे नाव ठेवतात, पण त्यातही फार तथ्य नसतं. कारण, त्यानंतर कोणाच्या नावाचा आणि व्यक्तिमत्वाचा किती मेळ बसेल, हे सांगता येत

उन्नती Read More »

आपला(च) माणूस

नुकताच ‘आपला मानूस’ हा सिनेमा बघितला. नानासाहेब पाटेकर यांचा सिनेमा असल्यामुळे आमच्या अपेक्षा जरा उंचावल्या होत्या. सिनेमा सुरू होतो अल्फ्रेड हिचकॉक स्टाईल मधे प्रेक्षकांच्या समोर एक डेड बॉडी पडून! ते पाहताच आम्ही घाबरून, मोबाईल बंद करून, धडधडत्या छातीला अन वाढत्या पोटाला न जुमानता, लाह्या खात खात सिनेमात रंगून गेलो. थोड्या वेळानी कळलं कि नानासाहेबांचा डब्बल

आपला(च) माणूस Read More »

बकेट लिस्ट – आमचीही

द बकेट लिस्ट नामक एक इंग्रजी सिनेमा अनेक वर्षांपूर्वी आम्ही पहिला होता. तो इंग्रजीत असल्यामुळे आम्हाला समजला नाही. बकेट लिस्ट नावाचा मराठी सिनेमा आम्ही नुकताच बघितला. तो मराठीत असूनही आम्हाला समजला नाही. सिनेमाच काय, आम्हाला तर त्याचं नाव देखील कळालं नाही. ‘Google Translate’ संकेतस्थळाला आम्ही ‘बकेट लिस्ट’ या शब्दांचा अर्थ विचारला असता त्याने ‘बादलीची यादी’

बकेट लिस्ट – आमचीही Read More »

वाट वेगळी…

२०१२ साली माझा १९ वर्षांचा मुलगा, अग्नेय, बी कॉम करत होता आणि त्याबरोबरच त्याचा CA म्हणजे Chartered Accountant किंवा सनदी लेखापाल बनण्यासाठी अभ्यास चालू होता. CA होण्यासाठी पहिली पायरी असते, Common Proficiency Test (CPT) आणि दुसरी असते IPCC. CPT बरीच अवघड असते आणि फार तर चाळीस टक्के विद्यार्थी त्यात पास होतात. IPCC त्याहीपेक्षा कठीण असते

वाट वेगळी… Read More »

भाग्यासी काय उणे रे…

आपण बरेचदा म्हणत असतो की माझ्याकडे पैसे नाहीत, किंवा पुरेसं शिक्षण नाही, किंवा मी खेड्यात जन्मलो, किंवा नशिबानं साथ दिली नाही म्हणून मला हवं तेवढं मोठं होता आलं नाही. बरोबर? तर ऐका राईट बंधूंची कहाणी. आपणा सगळ्यांना माहित आहे कि जगात विमान उडवणारे ते पहिले. पण त्यामागचे कष्ट आणि जिद्द किती जणांना ठावूक आहेत? ओर्विल

भाग्यासी काय उणे रे… Read More »

ह्या स्वातंत्र्यदिनी, डोळ्यात आलं पाणी

ह्या स्वातंत्र्यदिनी आलेल्या अनेक शुभेच्छा संदेशांमधे एक अत्यंत वेगळा फोटो होता, जो बघितल्यावर डोळ्यात पाणी आलं. आणि त्यानंतर डोळ्यात पाणी आणणारी आणखी एक घटना घडली. सुट्टी असल्याने प्रभात फेरीसाठी सकाळी उशिरा बाहेर पडलो आणि भरपूर चालून परत येताना घराजवळ ठप्प झालेल्या वाहतुकीमधे अडकलो. काही तरुणांनी एक ट्रक आणि खूप मोटारसायकली आडव्या लावून रस्ता बंद केला

ह्या स्वातंत्र्यदिनी, डोळ्यात आलं पाणी Read More »

You cannot copy content.